आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील हिरे रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू आहे. रुग्णालयातील १३ विभागांची कार्यप्रणाली बिघडली आहे. रुग्णालयात स्वच्छता नसते. सोनोग्राफीसाठी डॉक्टर वेळेवर हजर राहत नाही. सिटीस्कॅन, एक्स रे मशीन बंद आहे नियोजनाअभावी अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यातून रुग्णांचे आरोग्य धोक्यात येण्यासह त्यांची गैरसोय होते आहे. त्यामुळे याविषयाकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याविषयी गुरुवारी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे यांना निवेदन दिले.
या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आमदार शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ.सुशील महाजन, कैलास पाटील, समन्वयक नितीन शिरसाठ, गुलाब माळी, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, पुरुषोत्तम जाधव, ज्ञानेश्वर फुलपगारे, विनोद जगताप, मच्छिंद्र निकम, संजय जवराज, प्रवीण साळवे, मनोज गवळी, मनोहर पाटील, पंकज भारस्कर, महादू गवळी, प्रकाश शिंदे, संदीप चौधरी आदी उपस्थित होते.
या वेळी रुग्णालयाशी सबंधित विविध समस्या मांडण्यात आल्या. रुग्णालयात स्वच्छता होत नसल्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. तसेच काही औषधांची कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेरून औषधी घ्यावी लागतात. जनरल विभागात इतर संसर्गजन्य रुग्णांनाही ठेवण्यात आले आहे. बाह्य रुग्ण विभागात प्राध्यापक डॉक्टर नसतात. दहा दिवसांत प्रश्न सोडवावे, अशी मागणी झाली.
महिला वाॅर्डाकडेही दुर्लक्ष
प्रशिक्षणार्थी डॉक्टर तपासणी करतात. अपघात विभागात नेहमीच वर्दळ असतांना या ठिकाणी तज्ञ डॉक्टर थांबत नाही. महिलांच्या वॉर्डाकडेही दुर्लक्ष होते आहे. रक्ताचा पुरवठा होत नाही असा आरोप करण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.