आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवचन:शिंदखेडा जैन स्थानकात दीक्षार्थी दिशाचा सत्कार

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा जैन स्थानकात जैन श्री संघातर्फे जळगाव येथील दीक्षार्थी दिशा नीलेश पगारिया हिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महासती पूज्य मंगला यांनी प्रवचनात दीक्षार्थींना हित शिक्षा देताना सांगितले की, समभावात रमण करणे हेच संयम आहे. माेठ्यांशी विनय व्यवहार करणे, संयमरूपी दिवा तेवत ठेवण्यासाठी त्यात स्वाध्याय, विनय, सेवारूपी तेल टाकावे लागते. महासती पूज्य वर्षाजी यांनी गीतिकाद्वारे संयम जीवन कसे असावे हे सांगितले. दीक्षार्थीचे वडील नीलेश पगारिया म्हणाले मुलगा, मुलगी माेठी झाल्यावर,आई-वडील त्यांच्या उत्तम संसाराची स्वप्न पाहत असतात. माझ्या शुभकर्माचे उदय आहे, की माझी मुलगी जैन दीक्षा घेत आहे. गुरू रामची वाणी तिने हृदयात धारण केली आहे. ज्या उद्देशाने ती संयम घेत आहे.

ताे सफल हाेवाे, तिची दीक्षा ११ आॅक्टाेबर २०२२ राेजी उदयपूर येथे आचार्य राम यांच्या उपस्थितीत हाेणार आहे. दीक्षार्थी दिशाने आपल्या मनाेगतात सांगितले की, मी आत्मिक सुखाची अनुभूती घेत आहे. गुरू राम व सुयशाश्रीजी महाराज यांच्या कृपेमुळे संयम पथावर आरूढ हाेत आहे. गुरू आज्ञेत मी समर्पित हाेवाे, असा आशीर्वाद मला द्यावा, जैन श्री संघाचे अध्यक्ष मनाेहर पारख, सचिव प्रा.चंद्रकांत डागा, प्रवीण पारख, अशाेक राखेचा, डाॅ.सुरेश टाटिया, संदीप पारख, अशाेक राखेचा, डाॅ.सुरेश टाटिया, संदीप पारख आदींनी मनाेगत व्यक्त केले. दीक्षार्थीची आई ममता पगारिया, काका राेशन पगारिया, बहीण लब्धी, मनाेज कटारिया, ममता कटारिया, खुशालचंद्र आेस्तवाल आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...