आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:क्रीडा संकुलाची जलवाहिनी जीर्ण; दुरुस्तीचे अडले घोडे, महापालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे एकमेकांकडे बोट

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा संकुलाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला. गंज लागून जलवाहिनी जीर्ण झाली आहे. ती बदलावी लागेल. पण जलवाहिनी कोण बदलणार यावरून महापालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवत आहे.

जिल्हा क्रीडा संकुलात विहीर व बोअरवेल करण्यात आला आहे. पण त्याचा फारसा उपयोग होत नसल्याने या ठिकाणी महापालिकेचे नळ कनेक्शन घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी वाडीभोकर रोडलगत जलवाहिनीला गळती लागली. दुरुस्तीसाठी खोदकाम केल्यानंतर संपूर्ण जलवाहिनीला गंज लागल्याने ती जीर्ण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वाडीभोकर रोडपासून क्रीडा संकुलापर्यंत संपूर्ण जलवाहिनी बदलावी लागणार आहे. पण जलवाहिनी बदलणार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जलवाहिनी बदलण्यासाठी महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे. तसेच जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालयाची जलवाहिनी बदलण्याची तयारी नाही. ही जलवाहिनी वेळेत बदलली नाही तर जिल्हा क्रीडा संकुलाचा पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही. त्यामुळे जलतरण तलावाला पुरेसे पाणी मिळणार नाही. तीन ते चार दिवसांपूर्वीच जलतरण तलाव सुरू झाला आहे. त्यामुळे याविषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...