आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रस्त:शिंदखेडा शहरात घाण, दुर्गंधीयुक्त पाण्याने त्रस्त

शिंदखेडा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा शहरात देसाई गल्ली व हैदरअली चौक या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरपंचायत विरोधी पक्षाकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत नगरसेवक सुनील चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष दीपक देसले, नगरसेवक किरण थोरात, समद शेख, निमण पठाण यांनी पहाणी करून नगरपंचायत येथे जाऊन सीओंकडे तोंडी तक्रार केली.

अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यापासून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, नगरपंचायत प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र प्रशासनाला गांभीर्य नाही. त्यामुळे त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...