आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:धनूर येथील दिव्यांग बांधवांनी स्वातंत्र्य दिनी निधीसाठी केले धरणे आंदोलन

कापडणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील धनूर लोणकुटे येथील दिव्यांग बांधवांनी स्वातंत्र्य दिनीच दिव्यांग निधी मिळत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयात धरणे आंदोलन करीत निषेध नोंदवला. गेल्या चार वर्षांपासून दिव्यांग बांधव आपल्या हक्काच्या पाच टक्के निधीची मागणी करीत आहेत. मात्र धनूर लोणकुटे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने स्वातंत्र्य दिनीच दिव्यांग बांधवांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

या वेळी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देत दिव्यांग बांधवांनी निषेध नोंदवला. दिव्यांगांना राज्य सरकारतर्फे दिला जाणारा पाच टक्के निधी ग्रामपंचायतकडे थकीत असून तो देण्यात यावा व दिव्यांगांना व्यवसायासाठी २०० स्क्वेअर फूट जागा मिळावी, बांधकाम परवानगी देण्यात यावी, विनाअट घरकुल योजनेचा लाभ मिळावा, घरपट्टी, पाणीपट्टी शंभर टक्के माफ करण्यात यावी. ग्रामपंचायत मासिक मीटिंगमध्ये दिव्यांग प्रतिनिधी घेण्यात यावा तसेच घरकुल योजनेत ग्रामपंचायत जवळ असलेल्या जागेत जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. धनूर लोणकुटे ग्रामपंचायत प्रशासनाला दिव्यांग बांधवांनी निवेदन देत निषेध नोंदवला. या वेळी राजकुमार पाटील, रवींद्र चौधरी, नितीन माळी, लोटन कोळी, देवराम चौधरी, नरेंद्र चौधरी, योगेश पाटील आदी उपस्थित होते. गेल्या चार वर्षांपासून ग्रामपंचायत प्रशासन सहकार्य करीत नाही. सरपंच, ग्रामसेवक यांनी देखील दिव्यांग बांधवांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे, अशी माहिती राजकुमार दत्तात्रय पाटील यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...