आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरवठा:वीज थकबाकीदार भरणा करत नसल्यास पुरवठा खंडित करा ; ग्राहक वीज बिलाचा भरणा

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून वीजग्राहकांनी सहकार्य करावे. सूचना केल्यानंतर देखील ग्राहक वीज बिलाचा भरणा करत नसतील तर बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करावा, असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. धुळे व नंदुरबार मंडलाची आढावा बैठक डांगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार व नंदुरबार मंडलाचे अनिल बोरस उपस्थित होते. तसेच बैठकीला धुळे व नंदुरबार मंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, अधिकारी व मीटर रीडिंग एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...