आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्प:शिक्षकाच्या स्मरणार्थ नगाव गावात शंभर रोपांचे वाटप; संवर्धनाचा संकल्प

कापडणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील नगाव येथील एका शिक्षकाचा दोन आठवड्यापूर्वी कार अपघातात मृत्यू झाला होता. या शिक्षकाच्या स्मरणार्थ कुटुंबातील सदस्यांनी व मित्र परिवाराने शंभर वृक्षांचे वाटप केले.

नगाव येथील शिक्षक चंद्रकांत पवार यांचा ६ जून रोजी जळगाव येथील विवाह सोहळा आटोपून धुळ्याकडे परत येतांना एरंडोलजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थात गावात शंभर वृक्षांचे वाटप करण्यात आले. त्यात वड, कडुलिंब, पिंपळ, उंबर आदी वृक्षांचा समावेश आहे. या वेळी मृत चंद्रकांत पवार यांचा मुलगा कुंदन पवार, विजय पवार, संभाजी पवार, गणेश पवार, उमेश पवार, प्रकाश पवार, आकाश पवार, राज पाटील, जितू पाटील, समाधान पाटील, सुनील पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...