आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे एका महिन्यात बँकेने उद्दिष्टापेक्षा जास्त १०८ टक्के कर्जवाटप केले. येत्या पंधरा दिवसांत आणखीन ५० ते ६० कोटींचे कर्जवाटप होईल. बँकेतर्फे धुळे जिल्ह्यातील १७ हजार ५६१ सभासदांना १५५ कोटी ९९ लाख ४१ हजार तर नंदुरबार जिल्ह्यातील ८ हजार ९१ सभासदांना ९८ कोटी ६५ लाख १८ हजार असे दोन्ही जिल्ह्यातील २५ हजार ६५२ शेतकऱ्यांना २५४ कोटी ६४ लाख ५९ हजारांचे कर्ज वाटप झाले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत ८ टक्के कर्जवाटप जास्त आहे. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँकेतर्फे उद्दिष्टाच्या तुलनेत २ टक्के कर्जवाटप झाले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी एकूण कर्जवाटपाच्या उद्दिष्टापैकी ७० टक्के उद्दिष्ट जिल्हा बँकेला दिले जाते. त्यानुसार यंदाही जिल्हा बँकेला एकूण २२७ कोटींचे पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट होते. बँकेने ११ एप्रिलपासून कर्जाचे वाटप प्रारंभ केला. एक महिन्यात कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले. यंदा ३०० कोटीपेक्षा अधिक पीककर्जाचे वाटप होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत शंभर टक्के कर्जाची परतफेड केली आहे त्यांना तत्काळ कर्ज मिळते आहे. सभासदांना कर्जासाठी गावातील सचिवाकडे अर्ज व कागदपत्राची पूर्तता केल्यावर कर्ज मिळते. गेल्या वर्षी २५९ कोटींचे कर्ज वाटप झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.