आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानव विकास मिशन‎:12 विद्यार्थीनीना सायकलींचे वाटप‎

शहादा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोगापूर (ता. शहादा) येथील‎ माध्यामिक विद्यालयातील १२‎ विद्यार्थीनीना मानव विकास मिशन‎ अंतर्गत सायकलीचे वाटप केले.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ गटशिक्षणाधिकारी डी. टी. वळवी‎ होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय‎ पोषण आहारचे अधीक्षक डॉ. वाय‎ एम. सावळे, मानव विकास‎ मिशनच्या प्रमुख ममता पटेल, केंद्र‎ प्रमुख डी. जी. वायखर, जावदा त.‎ ह.चे मुख्याध्यापक एल. एम्.‎ पाटील, खेडदिगर विद्यालयाचे‎ प्राचार्य सी. पी. पाटील, एम. के.‎ पाटील, गोगापूर माध्यमिक विद्यालये‎ मुख्याध्यापक जे. के. पाटील आदी‎ उपस्थित होते.

मानव विषय मिशन‎ योजने अंतर्गत शाळेपासून ३ से ५‎ किलोमीटर अंतरावरील जवखेडा,‎ बडवी, तिधारे येथील ८ वीच्या‎ विद्यार्थिनीना सायकलीचे वाटप‎ करण्यात आले. मुख्याध्यापक जे.‎ के. पाटील यांनी प्रास्ताविक केले.‎ सायकल मिळाल्याने या‎ विद्यार्थीनीना शाळेत जाणे येणे‎ सोयीचे होणार आहे. कार्यक्रम‎ यशस्वी करण्यासाठी शाळेतील‎ शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम‎ घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‎ प्रिती पाटील यांनी केले. आभार एम.‎ आर. पटेल यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...