आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; कार्यक्रमास दिग्गजांची उपस्थिती

सारंगखेडा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेतक फेस्टीव्हल समितीचे अध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते रक्षदा कॉम्पलेक्स चौकात येथील मोरे कुटुंबाकडून गरजू विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य व वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी शारदा विद्या प्रसारक मंडळ विद्यालयाचे अध्यक्ष देवेंद्रसिंह रावल, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, प्रणवराजसिंह रावल, शांतीलाल जैन, रफिक शहा, रमेश मोरे, प्रल्हाद मोरे, भुषण मोरे, दिपक मोरे, विशाल मोरे, संजय मोरे, मनोज मोरे उपस्थित होते. समाजात अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना वह्या व शालेय साहित्य घेता येत नाही व ते अभ्यासापासून वंचित राहतात. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपक्रम विद्यार्थ्यांना लाभदायी ठरले, असे प्रतिपादन जयपालसिंह रावल यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...