आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरण:दोंडाईचात दिव्यांग जोडप्यांना मोफत व्यावसायिक साहित्याचे केले वितरण

दोंडाईचा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्यातर्फे दिव्यांग जोडप्यांना व्यवसायासाठी ५० हजारांचे व्यावसायिक साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम रोटरी क्लब सिनिअर व आरसीसी अपंग राऊंड टाऊनच्या माध्यमातून घेण्यात आला.

रोटरी क्लब सिनिअर व आरसीसी अपंग राऊंड टाऊनतर्फे रोटरी भवन येथे गेल्या महिन्यात सामुदायिक विवाह सोहळा झाला होता. त्या वेळी उद्योगपती सरकारसाहेब रावल यांनी प्रत्येक विवाहित दिव्यांग जोडप्यांना व्यवसायासाठी ५० हजार रुपयांच्या वस्तू देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये कोल्ड्रिंक्स व्यवसायासाठी डिप फ्रिज, ग्लास स्टंट फ्रिज, मिक्सर मशीन, कोल्ड्रिंक्स मटेरियल तसेच शिवण काम करणाऱ्या दिव्यांगांसाठी पिको फॉल शिवण यंत्र, खुर्च्या, मिनी चक्की यंत्र, स्टील कपाट तसेच किराणा दुकानासाठी किराणा माल आदी साहित्याचा समावेश होता. त्यानुसार पंचशीला व योगेश सैंदाणे- मुकटी, अश्विनी व संदीप कटोरिया-वडोदरा, योगिता व राकेश पाटील-बलदाने, शकुंती व धनराज पाटील- मांडळ या जोडप्यांना साहित्य देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...