आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक साहित्याचे वाटप:लोणखेडा येथे २५० विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

शहादा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, उपप्राचार्य प्रा.कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा.के.एच. नागेश यांच्या हस्ते कॉलेज बॅग, वह्या व गणवेशांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. विद्यार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. अभ्यास करा आणि गुणवंत व्हा, अशा शब्दांत समन्वयक प्रा. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आवाहन केले. या उपक्रमांचा लाभ एकूण २५० विद्यार्थ्यांना झाला. कला शाखेचे प्राध्यापक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...