आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपयुक्त ठरणाऱ्या साहित्याचे वितरण:पाडळदा आरोग्य केंद्रात ज्येष्ठांना साहित्य वितरण

शहादा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पाडळदा येथे एनएसई फाउंडेशन, सिनी टाटा ट्रस्ट, जिल्हा आरोग्य विभाग व पाडळदा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य सुरक्षा कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यांना उपयुक्त ठरणाऱ्या साहित्याचे वितरण करण्यात आले.

या वेळी डॉ.चंद्रकांत सामुद्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पाटील, सिनी कॉर्डिनेटर सुधीर ठाकरे, किशोर जाधव, अविनाश नाईक, आनंद पगारे, महेंद्र पवार, डोंगरसिंग पावरा उपस्थित होते. वयोवृद्धांना उत्कृष्ट प्रकारे आरोग्य सेवा पुरवल्याबद्दल डॉ.सामुद्रे यांच्या सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शिबिरात गरजू वयोवृद्धांना श्रवणयंत्र, चालण्यासाठी काठी, गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी बेल्ट, कमर बेल्ट, वाॅकर असे साहित्य भेट म्हणून वितरित करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या डॉ.पूजा यांनी राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांत सुरू आहे. त्यात व्यायाम, योगा व आरोग्य शिक्षण यांची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध प्रकारचे केंद्र सुरू केले.

बातम्या आणखी आहेत...