आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात शिवसेना पक्षाच्या वतीने ५०० कुटुंबांना मान्यवरांच्या हस्ते संसाराेपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. नुकताच हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
याप्रसंगी शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, संपर्कप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा समन्वयक दीपक गवते, जिल्हाप्रमुख गणेश पराडके, प्रदेश संघटक सुरेखा वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, माजी नगरसेवक विनोद चौधरी, के.जी. परदेशी, बच्छुसिंग परदेशी, किशोर परदेशी, विलास काकडे, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील, गिरीश मराठे, घारू कोळी आदी उपस्थित होते.
चंद्रकांत रघुवंशी दुसऱ्या गटात गेल्याने संघटना पुन्हा नव्याने उभारण्यासाठी प्रयत्न करू. सत्ता असताना दोन्ही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता सत्ता बदल होताच ते पक्ष सोडून गेले. जेथे सत्ता तेथे ते असतात, अशी खोचक टीका आमदार आमश्या पाडवींनी केली. कोणत्याही पक्षाने आजपर्यंत आदिवासी समाजाच्या व्यक्तीला जिल्ह्यातून विधान परिषदेचे आमदार केलेले नाही. मात्र शिवसेनेने ते करून दाखवले.
शिवसेना नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी उभी राहते. आगामी निवडणुकीत पालिकेवर सेनेचा भगवा फडकवणार असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा समन्वयक गवते, सहसंपर्कप्रमुख चौधरी यांनीही आमदार रघुवंशींवर टीका करत ते आपले नसल्यामुळे त्यांचे जाण्याचे दुःख नाही. भविष्यात सर्वांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. अधिकाधिक सदस्य नोंदणी व प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन केले. नगरसेविका प्रतीक्षा दुबे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन हितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शहर प्रमुख जितेंद्र दुबे, संजय पटेल, पुत्तन दुबे, सूरज माळी, विजय मराठे, जगदीश चौधरी, विपुल कुलकर्णी, श्रावण तिजवीज, जयेश सूर्यवंशी, नितीन ठाकरे, विनोद वंजारी, नितेश सोनार, काशिनाथ कोळी, अमन ठाकरे, कल्पेश सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.