आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संवर्धन:मोड पुनर्वसन वसाहतीत वृक्षारोपणासह रोपे वाटप; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बोरद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोड येथील सरदार सरोवर बधितांसाठी उभारण्यात आलेल्या नवीन वसाहतीत माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. तसेच या वेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.माजी क्रीडा मंत्री अँड.पद्माकर वळवी यांच्या हस्ते मोड येथील पुनर्वसनानिमित्त उभारण्यात आलेली वसाहत व परिसर वृक्ष्यांनी बहरला जावा या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर मोड येथील पुनर्वसन वसाहतीत वृक्ष लागवडीसाठी इच्छुक असणाऱ्यांना रोपांचे वाटप केले. या वेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती तळोद्याचे माजी अध्यक्ष प्रवीण वळवी, गणेश पाटील, ओरसिंग पटले, नूरजी वसावे, बेताब पावरा, त्याचबरोबर गावातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...