आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानतर्फे करवंद नाका परिसरात दिवाळी साजरी करूया, गरीबांच्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमातंर्गत दिवाळी व भाऊबीजनिमित्त निराधार, गरजू व कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांना साडीचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष विकास सेन, उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी, खजिनदार कुलदीप राजपूत, सचिव हेमलता येशी यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला.
अध्यक्षस्थानी तहसीलदार आबा महाजन हाेते. या वेळी गटविकास अधिकारी संजय सोनवणे, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक ध्रुवराज वाघ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, नगरसेवक गणेश सावळे, अजंदे येथील सरपंच राजेंद्र पाटील,अभियंता पद्माकर शिरसाठ, पंचायत समितीचे सदस्य यतीश सोनवणे, माजी सरपंच भीमसिंग राजपूत, सुरेश चौधरी, भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराज, संजय पाटील, संभाजी बोरसे, दिलीप येशी, रामचंद्र पवार, भरत येशी, अभियंता भालचंद्र वाघ, जीवन चौधरी आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.