आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा:बोरद येथील केंद्र शाळेकडून क्रमिक पाठ्यपुस्तकांचे अन्य शाळांना वाटप

बोरदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर क्रमिक पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले होते. त्या दृष्टीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला व तालुक्यातून प्रत्येक केंद्राला पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आलेले आहे. क्रमिक पाठ्यपुस्तके बोरद केंद्र शाळेला ही प्राप्त झाल्याने बोरद केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ७ जून रोजी बोरद केंद्र शाळेंतर्गत येणाऱ्या सर्व जि.प.शाळा तसेच माध्यमिक शाळा, शासकीय आश्रम शाळांना क्रमिक पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी केंद्रप्रमुख प्रवीण पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच याबाबत सर्व शाळांना सूचित केले होते. त्यादृष्टीने त्यांनी प्रत्येक शाळेच्या मागणीनुसार प्राप्त झालेल्या पुस्तकांमधून शाळेच्या आकडेवारीनुसार त्या त्या शाळेच्या पुस्तकांची वर्ग तसेच विषयवार मांडणी करून ठेवली व लागलीच उपस्थित शाळेतील कर्मचाऱ्यांना त्या त्या शाळेचे क्रमिक पाठपुस्तकांचे वितरण केले. इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या सर्व विषयांचे १३,४०० पुस्तके प्राप्त झाले. उपस्थित केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळेच्या कर्मचाऱ्यांनी खासगी वाहनाद्वारे ही पुस्तके शाळेत नेली.

बातम्या आणखी आहेत...