आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:महिलांना‎ शिलाई मशीनचे वाटप; जिल्ह्यात विधवा महिलांना‎ रोजगारासाठी शिलाई मशीन‎

सोनगीर‎एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू‎ झाल्याने विधवा झालेल्या महिलांना‎ उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांना‎ शाश्वत उपजीविकेची संधी मिळावी‎ यासाठी जिल्ह्यातील विधवा महिलांना‎ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.‎ कोरोना एकल महिला पुनर्वसन मिशन‎ वात्सल्य समितीतर्फे तहसीलदार गायत्री‎ सैंदाणे, राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी,‎ एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी‎ दीपाली देसले, जिल्हा समन्वयक ईश्वर‎ पाटील यांच्या सहकार्याने हा उपक्रम‎ राबवण्यात आला.

या वेळी आशाबाई‎ देवाजी पाटील (रा.फागणे), वैशाली‎ शिवदास गायकवाड (रा.सोनगीर),‎ सुनीता गजेंद्र देसले (रा.माळीच), विद्या‎ भटू ठाकूर (रा.दोंडाईचा), मनीषा‎ सोनवणे (रा.कर्ले) या पाच विधवा‎ महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात‎ आले. युवा सेनेचे अध्यक्ष पंकज गोरे,‎ एकल वात्सल्य समितीचे सदस्य ईश्वर‎ पाटील, धुळे तालुका समन्वयक पीयूष‎ शिंदे, योगेश शिरसाट, नवल ठाकरे आदी‎ उपस्थित होते.‎