आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:आनंदाचा शिधा योजनेच्या साखरेचे आता वाटप सुरू

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीनिमित्त राज्य सरकारने गरिबांना शंभर रुपयांत चार वस्तूंचा समावेश असलेला आनंदाचा शिधा वाटप केला. पण जिल्ह्याला साखरेचा पुरेसा पुरवठा न झाल्याने तीनच वस्तूंचे वाटप झाले. आता साखरेचा पुरवठा झाल्याने शहरातील सर्व रेशन दुकानातून साखर वाटप सुरू झाले असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातर्फे देण्यात आली.

आनंदाचा शिधा एकाच वेळी राज्यभरातील सर्व रेशन दुकानातून वाटप करावा लागणार होता. तसेच दिवाळीच्या तोंडावर या योजनेची घोषणा झाली. चारही वस्तूंचा पुरवठा वेगवेगळ्या ठेकेदाराकडून हाेत असल्याने तो कमी अधिक प्रमाणात झाला. जिल्ह्याला साखरेचा ५० टक्केपेक्षा पुरवठा कमी झाला.

त्यामुळे दिवाळीपूर्वी तीन वस्तूंचे वाटप झाले. त्यानंतर गेल्या आठवडाभरात जिल्ह्याला चार ते पाच ट्रक साखरेचा पुरवठा झाला. त्यामुळे आता साखर वाटप सुरू झाले आहे. ज्यांना साखर मिळाली नाही त्यांनी दुकानदारांशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार गायत्री सैंदाणे, पुरवठा निरीक्षक मायानंद भामरे आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...