आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:शबरी आवास योजनेत जिल्हा सर्वोत्तम; सीएम करणार मुंबईत गौरव

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाआवास अभियान सन २०२०-२१ मध्ये जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली. शबरी आवास योजनेत जिल्हा राज्यात सर्वोत्तम ठरला. तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण विभागात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा २४ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. जिल्ह्याला पुरस्कार मिळाल्याने अधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे.

तसेच उत्कृष्ठ डेटा एन्ट्री ऑपरेटरचा विशेष पुरस्कार अमोल माळी यांना मिळाला आहे. सर्वांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २४ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सत्कार होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित असतील, अशी माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...