आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी प्रदर्शन:सारंगखेडा यात्रोत्सवात जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन

सारंगखेडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील सारंगखेडा यात्रेत कृषी विभाग व आत्मा अंतर्गत जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल रावल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, उपविभागीय कृषी अधिकारी

तानाजी खर्डे, तंत्र अधिकारी वसंत चौधरी, तालुका कृषी अधिकारी, किशोर हडपे आदी उपस्थित होते. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले. या वेळी जयपाल रावल यांचे यांचे कृषी विभागामार्फत स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी स्टॉल भेट देऊन तालुक्यातील विविध भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांचे उच्च प्रतीचे शेतमाल नमुने हळद कंद, रान कांदा, पपई, ड्रॅगन फूड, मिरची पावडर, हळद पावडर, कडंबीचे फुल, लेमन ग्रास तेल, ऊस, केळी, पपई, पेरू, भाजीपाला वांगी, टमाटे, मिरची आदी पाहणी केली. तसेच विकेल ते पिकेल अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान मार्फत भाजीपाला विक्रीच्या स्टॉल रवींद्र सोनवणे कळंबू यांनी भाजीपाला विक्री केली. प्रदर्शनासाठी कृषी विभगातील अधिकारी व कर्मचारी सहकार्य करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...