आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे २१ ते २३ एप्रिल दरम्यान पुण्यातील भोसरी येथे वरिष्ठ गटाची राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा झाली. स्पर्धेत चुरस दिसली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव नरेंद्र पाटील, कोषाध्यक्ष हेमंत भदाणे, गोमाजी थोरात, प्रशिक्षक प्रमोद पाटील, अविनाश वाघ, सुभाष पावरा, नीलेश पाटील, महेंद्र गावडे, मयूर काकडे, तेजस सोनवणे, सोमेश जाधव, विलास वळवी, अक्षय कोणकर, सतीश जाधव आदी उपस्थित होते. विविध क्रीडा प्रकारात स्पर्धा झाली. जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. विजयी खेळाडू राज्यस्तरावर सहभागी होतील. स्पर्धेचा निकाल असा प्रथम, द्वितीय, ततीय या क्रमाने : १० कि.मी. धावणे : जगन्नाथ पवार, जगन पावरा, विक्की आंबेकर. ५ किमी धावणे : शरद अहिरे, जगन्नाथ पवा, आशिष जगताप. १५०० मीटर धावणे : रोशन माळी, मनोज जाधव, अरुण पाटील. ८०० मीटर धावणे : प्रफुल्ल लाटे, रमेश पावरा, सागर वाघ. २०० मीटर धावणे : हर्षवर्धन थोरात, अरविंद पावरा, दत्तात्रय झोडगे. थाळीफेक : अमोल पवार, विठ्ठल नवसारे, चेतन सैंदाणे. गोळाफेक : शिवम सोनवणे, अमोल पवार, भाऊसाहेब कोळी. भालाफेक : अनिल पावरा, अमोल पवार, रवींद्र पगारे. लांब उडी : रवींद्र चव्हाण, गणेश मासुळे, वैभव देवरे. उंचउडी : हितेश साळुंखे, हितेश पाटील. मुली- ४०० मीटर धावणे : किर्ती राठोड, रंजना पावरा, मोनिका पावरा. १०० मीटर धावणे : आकांक्षा सैंदाणे, दीपाली पाटील, प्रज्ञा बैसाणे. थाळीफेक : गीतांजली देवरे, रूपाली देवरे. गोळाफेक : कीर्ती राठोड, गीतांजली देवरे, रूपाली देवरे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.