आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध मागण्या:घरकुल योजनेसाठी दिव्यांग महापालिकेत धडकले

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांगांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी शंभर टक्के खर्च करावा, बेघर दिव्यांगांसाठी घरकुल योजना राबवावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग आघाडीसह अपंग पुनर्विकास संस्थेतर्फे सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय सरग, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, यशवंत डोमाळे, मंगेश जगताप, भिका नेरकर, लखन चांगरे, उमेश महाले, राजेंद्र सोलंकी, संजय माळी, हाशिम कुरेशी, दीपक देवरे, जितेंद्र पाटील, निखिल पाटील, कुणाल वाघ, रामेश्वर साबरे, असलम खाटीक, अमित शेख, डॉमनिक मलबारी, पांडुरंग नरव्हाळ, तरुणा पाटील, भारती तावडे, मंगला पाटील आदी उपस्थित होते. दिव्यांगांच्या नोंदणीसाठी महापालिकेने शिबिर घ्यावे, दिव्यागांसाठी शहरात भवन बांधावे, व्यवसायासाठी मनपाने जागा द्यावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...