आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना‎:तापी पाणीपुरवठा योजनेचा‎ वीजपुरवठा खंडित करू नका‎

धुळे‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचा‎ वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी‎ वितरणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तापी‎ योजनेच्या सुकवद व बाभळे येथील केंद्राचा‎ वीजपुरवठा खंडित झाला तर वीज कंपनीने‎ तातडीने पर्यायी उपाययोजना करावी, वीज‎ पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी‎ घ्यावी, अशी सूचना महापौर प्रतिभा चौधरी‎ यांनी केली.‎

पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित‎ होत असल्याने मनपात मंगळवारी वीज‎ कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या‎ वेळी त्या बोलत होत्या. या वेळी उपमहापौर‎ नागसेन बोरसे, आयुक्त देविदास टेकाळे,‎ स्थायी समिती सभापती किरण कुलेवार आदी‎ उपस्थित होते. तापी योजनेच्या सुकवद,‎ बाभळे येथील पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा‎ खंडित होऊ नये यासाठी उपाययोजना करावी,‎ अशी सूचना बैठकीत झाली.

तापी योजनेला‎ वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वीज‎ वाहिनीवर बिघाड झाल्यास पर्यायी‎ फीडरवरून वीजपुरवठा उपलब्ध करून‎ देण्याचा निर्णय झाला. तसेच उपाययोजना‎ झाल्या नाही तर पालकमंत्र्यांकडे तक्रार‎ करण्यात येईल, असा इशारा महापौर प्रतिभा‎ चौधरी यांनी दिला.

तसेच वीज वाहिन्यांना‎ अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्यांची छाटणी‎ करताना वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी‎ महापालिकेला कळवावे. पाणी वितरणावेळी‎ विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता‎ घ्यावी, अशी सूचना झाली. बैठकीला वीज‎ कंपनीचे कार्यकारी अभियंता आर. एम.‎ पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी.‎ डी. साळुंखे, उपायुक्त विजय सनेर, अभियंता‎ कैलास शिंदे, विद्युत अभियंता एन. के. बागूल,‎ कनिष्ठ अभियंता प्रदीप चव्हाण उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...