आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:जमिनीच्या आर्थिक मोबदल्यासाठी कागदपत्रे तातडीने जमा केली जावी

शिरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेर मध्यम प्रकल्पांतर्गत दहा व चौदा क्रमांकाच्या चारीसाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित झाली आहे. त्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या आर्थिक मोबदल्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात तातडीने कागदपत्रे जमा करावे असे आवाहन आमदार अमरीश पटेल व आमदार काशिराम पावरा यांनी केले आहे.

आमदार अमरीश पटेल, आमदार काशिराम पावरा व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेश पटेल यांनी अनेर मध्यम प्रकल्पांतर्गत वाढीव कालवा वितरिका क्रमांक १० व १४ साठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहे त्यांना मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप झाले. त्यानंतर आमदार काशिराम पावरा यांनी प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांच्या कार्यालयात बैठक घेतली. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, ॲड. बाबा पाटील उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला लवकर मिळावा व अनेर धरणाचे पाणी सोडावे, अशी मागणी आमदार पावरा यांनी केली. जमिनीच्या मोबदल्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयाने कागदपत्रे जमा करण्याबाबत अनेक दिवसांपूर्वी नोटीस दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी ११ मेपर्यंत कागदपत्र जमा करावी, असे आवाहन आमदार अमरीश पटेल व भूपेश पटेल यांनी केले आहे. दहा नंबरच्या चारीसाठी ज्या शेतकऱ्यांची जमिनी संपादित झाली आहे. त्यांच्यासाठी १ कोटी ४५ लाख तर चौदा नंबरच्या चारीसाठी ज्यांची जमिनी संपादित झाली आहे, त्यांच्यासाठी २ कोटी ६९ लाखांचा मोबदला प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...