आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळी:कुत्र्यांनी बोकडांवर मध्यरात्री हल्ला; कापडणे येथे मोकाट कुत्र्यांनी घेतला तीन बोकडांचा बळी

कापडणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शेतकरी वसंत पाटील यांच्या गुरांच्या गोठ्यात मोकाट कुत्र्यांनी बोकडांवर मध्यरात्री हल्ला चढवला. यात मोकाट कुत्र्यांनी तिन्ही बोकडांचे लचके तोडून ठार केले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.

गावात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे. धनूर रस्त्यालगत राहणारे शेतकरी वसंत देवराम पाटील यांच्या गोठ्यात गुरे व शेळ्या बांधलेल्या होत्या. यावेळी मध्यरात्री मोकाट कुत्र्यांनी गोठ्यात प्रवेश करीत तीन बोकडांचे लचके तोडत ठार केले.

यामुळे पंधरा हजारांपेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वसंत पाटील, मच्छिंद्र बोरसे, दीपक बोरसे, शरद बोरसे, हिरालाल बोरसे, पारस बोरसे, सुरेंद्र बोरसे, राजेंद्र बोरसे, मुन्ना पवार, दगडू बोरसे, विवेक बोरसे, धनराज पाटील आदींनी केली आहे.

कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
गावात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रस्त्यावर व अंगणात खेळत असणाऱ्या बालकांनादेखील कुत्रे चावा घेतात. ग्रामपंचायत प्रशासनाने कुत्र्यांचा लवकर बंदोबस्त करावा अन्यथा मोठा अपघात या मोकाट कुत्र्यांमुळे होऊ शकतो. - उज्वल बोरसे, ग्रामस्थ

बातम्या आणखी आहेत...