आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी:सामोडे ग्रामपंचायतीत ‘ग्रामविकास’चे वर्चस्व ; 17 जागांसाठी निवडणूक झाली

पिंपळनेर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील सामोडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १६ जागांवर ग्रामविकास पॅनलने विजय मिळवला. मतमोजणी शुक्रवारी सकाळी झाली. सामोडे ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीत हर्षवर्धन शिवाजीराव दहिते यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलच्या ७ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित १० जागांसाठी मतदान झाले हाेते.

निवडणूकीत वार्ड क्रमांक एकमधून तुकाराम तुळशीराम दहिते, भारती राजू मालुसरे, अपक्ष उमेदवार सागर अशोक पानपाटील, वार्ड क्र.२ मधून सुरेखा राजेंद्र घरटे, सोमनाथ पंडित गांगुर्डे, वार्ड क्रमांक ३ मधून सचिन पंडितराव शिंदे व शशिकला शरद भदाणे, वार्ड क्र. ५ मधून मनीषा रवींद्र शिंदे, अर्जुन शंकर सोनवणे, सोनम सुनील पवार यांनी विजय मिळवला. वसंत शामराव घरटे यांच्या परिवर्तन पॅनलचा एकही उमेदवाराचा विजयी झाला नाही. हर्षवर्धन शिवाजीराव दहिते यांनी १७ पैकी १६ जागा जिंकल्या. तसेच अपक्ष सागर अशोक पानपाटील यांनी ग्रामविकास पॅनलमध्ये प्रवेश केला आहे. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...