आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:शिंदखेडा सोसायटीत ‘सहकार’चे वर्चस्व; बिनविरोध निवडीची परंपरा खंडित

शिंदखेडा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा विविध कार्यकारी सोसायटीवर सहकार गटाने वर्चस्व प्राप्त केले आहे. सोसायटीची निवडणूक चुरशीची झाली. तब्बल २४ वर्षांनंतर यंदा मतदान झाल्याने बिनविरोध निवडीची परंपरा खंडित झाली.

येथील शिंदखेडा विविध कार्यकारी सोसायटीच्या जागा वाटपावरून मतभेद झाल्याने १२ जूनला मतदान झाले. नगरसेवक अनिल वानखेडे व इतर सहकाऱ्यांचे सहकार पॅनल व माजी नगरसेवक दीपक सुधाकर देसले व विद्यमान नगरसेवक सुनील बाजीराव चौधरी यांच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये लढत झाली. सहकार पॅनलचे नऊ उमेदवार विजयी झाले. एकूण ७८३ मतदार होते. तसेच दोन्ही पॅनल मिळून एकूण २६ उमेदवार रिंगणात होते. सुमारे २४ वर्षांनंतर मतदान झाले.

त्यानंतर रविवारी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान झाले. निवडणुकीत एका मतदाराला १३ उमेदवारांना मत द्यावयाचे होते. निवडणुकीत सहकार गटाचे दिनेश बंडू सूर्यवंशी २७९, मनीषा राकेश चौधरी २८१, आशाबाई भगवान मराठी २८७, बन्सीलाल पीतांबर बोरसे २८३, दगा तालुका चौधरी २५०, प्रकाश रतन चौधरी २४०, सदाशिव नागो देसले २७२, रमेश चिंतामण भामरे २४५, युवराज नामदेव माळी २३८ आणि शेतकरी विकास पॅनलचे दिलीप आधार भामरे २५२, मनीष कालिदास देसले २६९, प्रकाश नथू पाटील २४२, सचिन चंद्रकांत दिसले ३२४ हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. एस. दशपुते यांनी काम पाहिले. त्यांना सचिव धनराज शिरसाठ यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...