आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध:वाघोदे सोसायटीमध्ये ‘विकास’चे वर्चस्व

कापडणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे येथील नूतन कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विकास पॅनलने ११ पैकी ८ जागा जिंकून बाजी मारली. राखीव गटातील दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. भारतीय जनता पक्ष पुरस्कृत विकास पॅनलने माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषद सदस्या संजीवनी सिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच गोविंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. विकास व नम्रता पॅनलमध्ये लढत झाली. विकास पॅनलने ८ जागांवर विजय मिळवला. विकास पॅनलतर्फे भटू पोपट पाटील, युवराज रतन पाटील, जगन्नाथ हिलाल माळी, नारायण सुखदेव माळी, भानुदास पीतांबर माळी, लक्ष्मण रामदास माळी, यशोदाबाई गोविंदा माळी, भगवान गोविंदा वाघ यांनी विजय मिळवला. नवनिर्वाचित सदस्यांचा माजी सरपंच गिन्यान माळी, हिरालाल ठाकरे, भाईदास पाटील, निंबा पाटील, चुनीलाल पाटील, युवराज पाटील, संतोष माळी, हिंमत कोळी, प्रेमराज पाटील, श्रीकृष्ण पाटील, सुरेश माळी, समाधान वाघ, सतीश पाटील, मनोज ठाकरे, नगराज ठाकरे, शरद माळी, अनिल माळी, कैलास माळी, नगराज पाटील, विजय माळी, गणेश माळी, भास्कर माळी, राजेंद्र माळी, विजय पाटील, ईश्वर माळी, रवींद्र माळी यांनी सत्कार केला. सोसायाटीच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करण्याचा संकल्प नवनिर्वाचित संचालकांनी केला.

बातम्या आणखी आहेत...