आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बससेवा:16 वर्षांनी भडणे ते दोंडाईचा बससेवा; ग्रामस्थांना दिलासा

शिंदखेडा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील भडणे-सोनशेलू-विखरण-दोंडाईचा ही बस सुरू करण्यासाठी ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार तब्बल सोळा वर्षांनंतर ही बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

भडणे ते दोडाईचा रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे भडणे ते दोंडाईचा बससेवा बंद होती. पण गेल्या वर्षात भडणे, विखरण रस्त्याचे काम झाले. तसेच भडणे ते सोनशेलू, विखरण येथून बस नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. भडणे ते दोंडाईचा बससेवा सुरू व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. याविषय सरपंच व शिवसेनेचे तालुकाप्रमुख गिरीश देसले, विखरण येथील सरपंच प्रतिनिधी धीरज बडगुजर, महेंद्र पवार आदींनी लावून धरला. बससेवा सुरू केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर एसटी महामंडळाने १९ जूनपासून भडणे ते दोंडाईचा बससेवा सुरू केली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख गिरीश पाटील यांच्या हस्ते बससेवेला प्रारंभ झाला. या वेळी भडणे येथील सरपंच गिरीश देसले, उपसरपंच जगतसिंग गिरासे, माजी सरपंच अशोक पाटील, पोलिस पाटील युवराज माळी, पुरुषोत्तम गोसावी, सतीश माळी, विठोबा पाटील, रमेश पाटील, धनराज पाटील, खुशाल पाटील, नितीन पाटील, भाऊसाहेब ठाकूर, दयाराम माळी, अशोक कोळी, सुरेश मगळे, रामकृष्ण माळी, राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...