आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग कुरणातील लांडोर बंगला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९३८ मध्ये भेट दिली होती. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी २९ वर्षांपासून या ठिकाणी दरवर्षी ३१ जुलैला भीमस्मृती यात्रा भरते. दाेन वर्षे काेराेनाचा खंड सोडला तर ही यात्रा नियमित हाेत होती. यंदाही उद्या रविवारी (दि. ३१) यात्रा होईल.
न्यायालयीन कामकाजासाठी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शहरात आले होते. त्या वेळी त्यांनी लांडाेर बंगला येथे मुक्काम केला हाेता. त्यांची आठवण स्मरणात राहावी यासाठी माजी प्राचार्य कै. जे. जी. खैरनार यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी भीमस्मृती यात्रा भरवण्यास सुरुवात केली. हा उपक्रम अखंडित सुरू आहे. त्यानुसार उद्या रविवारी यात्रा होईल. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. भीमगीतांसह अन्य कार्यक्रम होतील. या कार्यक्रमांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दाेन वर्षांच्या खंडानंतर हाेणाऱ्या यात्राेत्सवाला अनेक जण कुटुंबासह हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी झाली आहे.
भीमगीतांच्या कार्यक्रमासह मानवंदना
बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या ट्रॅव्हल्स बंगला येथेही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आले हाेते. या ठिकाणीही रविवारी बुद्धवंदना, अस्थिकलश दर्शन, महार बटालियनच्या माजी सैनिकांची मानवंदना व दुपारी ४ वाजता कडूताई खरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम हाेणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाला रिपाईचे दीपक केदार उपस्थित असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.