आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:युफोरिया स्पर्धेतून कौशल्य वाढीसाठी चालना; एसव्हीकेएम संस्थेच्या एनएमआयएमएस स्कूल ऑफ कॉमर्समध्ये स्पर्धा, 400 विद्यार्थी सहभागी

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील एसव्हीकेएम संस्था संचलित एनएमआयएमएस स्कूल ऑफ कॉमर्समध्ये युफोरिया स्पर्धा झाली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघ भावना विकसित व्हावी, कॉर्पोरेट ज्ञान व सामान्यज्ञान वाढावे, त्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळावी या उद्देशाने ही स्पर्धा झाली.

स्पर्धेत एस.व्ही.के.एम. संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ फार्मसी, स्कूल ऑफ कॉमर्स तसेच एसएसव्हीपीएस, एम.डी. पालेशा, जयहिंद, विद्यावर्धिनी महाविद्यालयासह अन्य महाविद्यालयातील ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

ही स्पर्धा क्यूझेरिया व मॅनेजमेंट गेम या दोन भागात घेण्यात आली. क्यूझेरिया भागात मानव अग्रवाल, केवल जैन (स्कूल ऑफ कॉमर्स) यांना प्रथम, लोकेश पाटील, तेजस चौधरी (इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) यांना द्वितीय व तिशा जाधव, प्रथमसिंग (स्कूल ऑफ कॉमर्स) यांना तृतीय पारितोषिक मिळाले. मॅनेजमेंट गेममध्ये लिक्षित जयसिंघानी, निखिल लुल्ला (इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ फार्मसी), हर्ष अग्रवाल, ध्रुवेश चव्हाण (एम.डी. पालेशा कॉलेज) यांना प्रथम, मोहित पवार, आदित्य खंडेलवाल (इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), रोहन जैन, साईविवेक बलीपती (स्कूल ऑफ कॉमर्स) यांना द्वितीय व देवयानी जाधव, सुरभी गुप्ता, पवन पाटील, अनिश नाळे (इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) यांना तृतीय पारितोषिक मिळाले.

कार्यक्रमाला मेघा गिंदोडिया व रेखा मुंदडा उपस्थित होते. प्रभारी असोसिएट डीन सी.ए. कुणाल पसारी यांनी स्वागत केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी स्कूल ऑफ कॉमर्सचे प्रभारी असोसिएट डीन सीए कुणाल पसारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. राजेंद्र अग्रवाल, डॉ. आस्था शर्मा, सीए पूजा सदाने, सीए रजत अग्रवाल, अनघा तायडे, नेहा तनेजा, नितीन चव्हाण, विद्यार्थी परिषद ई-सेलचे प्रेम अग्रवाल, सक्षम शर्मा, कार्तिक खंडेलवाल, दिनेश देशमुख, नंदकिशोर गोसावी, हर्षल मोरे, राकेश भारती, नीलेश पारकर, मंगेश गुजर, मुदस्सीर पठाण, विशाल बारी, प्रमोद ठाकूर यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...