आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रोन प्रशिक्षण:कृषीच्या विद्यार्थ्यांना ड्रोन प्रशिक्षण; सिजेंटा इंडिया कंपनी

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र आणि सिजेंटा इंडिया कंपनीतर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण शिबिर झाले. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर शिबिर झाले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर अध्यक्षस्थानी हाेते. या वेळी शांताराम मालपुरे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रा. डॉ. दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक तुकाराम औटी उपस्थित होते. प्रा.डॉ. दिनेश नांद्रे यांनी ड्रोन तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाची माहिती दिली. कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी कृषी ड्रोन निर्माण झाले आहे. या वेळी त्यांनी ड्रोन फवारणी प्रात्यक्षिकाचा उद्देश समजावून सांगितला.

ड्रोनचा वापर फवारणी, निरीक्षण, पीक वाढीचे मूल्यांकन, ड्रोन परागीकरण, तण, कीड आणि रोगावर नियंत्रण, पक्षापासून संरक्षण, पिकांची देखरेख आदी कामांसाठी केला जातो असेही ते म्हणाले. कृषी विज्ञान केंद्राच्या सोयाबीन बीजोत्पादन प्रक्षेत्रावर ड्रोन फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. ड्रोन उडवण्यापूर्वी आणि खाली उतरवताना काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन झाले.

बातम्या आणखी आहेत...