आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Due To Change In Reservation Of Shahada Municipality, The Established Will Have To Find A Safe Ward; The Other Woman In The House Will Have To Enter The Arena |marathi News

आरक्षण सोडत:शहादा नगरपालिकेच्या आरक्षण बदलामुळे प्रस्थापितांना शोधावा लागेल सुरक्षित प्रभाग; घरातील अन्य महिलेला रिंगणात उतरवावे लागणार

शहादा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगरपालिकेची सोमवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. २९ सदस्यांपैकी १५ जागा महिलांसाठी आरक्षित निघाल्या. या सोडतीमुळे काही प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसला तर काहींना दिलासा मिळाला. ज्या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले त्यांना आता सुरक्षित प्रभाग शोधावा लागेल. काही जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने प्रस्थापित नगरसेवकांना पत्नी किंवा घरातील अन्य महिलेला रिंगणात उतरवावे लागणार आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

सन २०११च्या जनगणनेनुसार शहादा शहराची लोकसंख्या ६१ हजार ३७६ असून पैकी तीन हजार ९८६ अनुसूचित जाती तर सात हजार ७२२ अनुसूचित जमातीच्या नागरिकांची लोकसंख्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज आरक्षण सोडत काढताना १४ पैकी दोन प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून, त्यातून दोन सदस्य, चार प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले असून यातून चार सदस्य तर उर्वरित नऊ प्रभाग हे सर्वसाधारण गटासाठी असणार असून, या प्रभागातून १९ सदस्य निवडले जाणार आहे. प्रत्येक प्रभागातील अ जागा ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली असून, प्रभाग क्रमांक १४ मधील दोन जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहे.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
प्र. क्र. अ ब
१ सर्वसाधारण महिला अनुसूचित जमाती
२ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
३ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
४ अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण
५ अनुसूचित जमाती महिला सर्वसाधारण
६ अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण
७ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
८ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
९ अनुसूचित जमाती महिला सर्वसाधारण
१० अनुसूचित जमाती सर्वसाधारण
११ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
१२ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
१३ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण

बातम्या आणखी आहेत...