आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:गो ग्रीन मुळे 3  हजार 700  ग्राहकांना वीजबिलात दरमहा 10  रुपये सवलत

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज वितरण कंपनीतर्फे आता पेपरलेस कारभारावर भर दिला जातो आहे. त्यानुसार छापील वीजबिलाएेवजी गो ग्रीन योजनेंतर्गत ई-मेलवर वीजबिल पाठवले जाते. जिल्ह्यातील सुमारे ३ हजार ७०० वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहे. या ग्राहकांना दरमहा वीजबिलात दहा रुपये सवलत दिली जाते. पर्यावरण संवर्धनासाठी गो ग्रीन योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन वीज कंपनीने केले आहे.

गो-ग्रीन योजनेंतर्गत वीज ग्राहकांना छापील बिलाएेवजी थेट मेलवर बिल पाठवले जाते. त्यामुळे या ग्राहकांना वीजबिल वेळेवर मिळते. तसेच संदर्भासाठी वीजबिल जतनही करता येते. राज्यात तब्बल ५६ हजार ग्राहकांनी गो ग्रीन योजनेत सहभाग नोंदवला आहे.

त्यात जिल्ह्यातील ३ हजार ७०० ग्राहकांचा समावेश आहे. वीज कंपनीने वीज बिल ऑनलाइन भरण्याची सुविधाही दिली आहे. वीज कंपनीचे अॅप किवा संकेतस्थळावर वीजबिल भरता येऊ शकते. वीज बिलावरील क्यूआर कोड स्कॅन करुन वीज बिल भरता येते. त्यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बँकिंग, डिजिटल व्हॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआयचा वापर करता येतो अशी माहिती देण्यात आली.

एक लाख ग्राहक भरता ऑनलाइन विजेचे बिल
महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन पेमेंट सुविधेचा वीज कंपनीच्या धुळे विभागातील १ लाख १ हजार ४०० घरगुती, औद्योगिक व वाणिज्य ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्यांनी ऑनलाइन २० कोटी ५० लाख रुपये जमा केले आहे. ऑनलाइन पेमेंटवर ०.२५ टक्के सवलत देण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...