आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा अडकला:मुसळधार पावसामुळे पुन्हा तुंबल्या गटारी ; चौकाचौकात साचले पाणी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गुरुवारी मध्यरात्री पाऊस झाल्यानंतर शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पुन्हा सायंकाळी पावणेपाच वाजता जोरदार पाऊस झाला. दीड तास मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे शहरातील गटारी, नाले पुन्हा तुंबल्याने चौकाचौकात पाणी साचले होते. शहरात १८ व १९ सप्टेंबरला झालेल्या पावसानंतर अनेक भागात अशीच स्थिती होती. त्यानंतर नाले व गटारी स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण अनेक भागातील गटारी व नाल्यांची स्वच्छता झाली नाही.

शहरासह जिल्ह्यात पंधरा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. दुसरीकडे उन्हाचा तडाखा वाढला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री शहरासह जिल्ह्यात पाऊस झाला. सकाळी ८ वाजेपर्यंत चोवीस तासात ३ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सूरूवात झाली. सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शहरातील गटारी पुन्हा तुंबल्या. शहरात १८ आणि १९ सप्टेंबरला मुसळधार पावसामुळे नाले तुंबले हाेते. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यानंतर तातडीने नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यासह नाल्यांची स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर काही भागातील गटारी साफ झाल्या पण कचरा रस्त्यावरच पडून होता. पावसामुळे गटारीच्या बाजूला पडलेला कचरा पुन्हा गटारी अडकला.

इंदिरा गार्डन चौक तुडूंब
भरत नगर चौकात शुक्रवारीही गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. या परिसरातून वाहणाऱ्या नाल्याला पुर आल्याने शिवप्रताप कॉलनीपर्यंत गुडघ्यापर्यंत पाणी होते. या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली. हिच स्थिती इंदिरा गार्डन चौकात होती. या चौकातील गटारीतून पाण्याचा निचरा होत नव्हता. महापालिकेच्या जुन्या इमारतीसमोरही पाणी साचले होते. पांझरा नदीवरील तळफरशी पुलाच्या पाइप मोरीत पुन्हा कचरा अडकला होता.

बातम्या आणखी आहेत...