आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम रखडले‎:निधी नसल्याने नकाणे‎ रस्त्याचे काम रखडले‎

धुळे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नकाणे रस्त्याचे‎ काम काही महिन्यांपासून निधी‎ नसल्याने रखडले आहे.‎ शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी‎ शासनाने १०० कोटी रुपये मंजूर केले.‎ त्यातील ७० टक्के रक्कम शासन‎ देणार असून, ३० टक्के रक्कम‎ महापालिकेला द्यावी लागणार आहे.‎ महापालिकेने हिस्सा जमा केल्यावर‎ शासनाकडून अनुदान वितरित होते.‎ त्यानुसार शासनाने महापालिकेला‎ निधी दिला. पण आता निधी‎ नसल्याने कामे थांबली आहे.‎

त्यानुसार गल्ली क्रमांक पाच,‎ सहामधील रस्त्याचे काम थांबले‎ आहे. तसेच नकाणे रस्त्याचे काम‎ अर्धवट झाले असून, हे काम सहा‎ महिन्यांपासून बंद आहे. रस्त्यावर‎ मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने‎ रस्त्याचे काम तातडीने करण्याची‎ आवश्यकता आहे.‎

बातम्या आणखी आहेत...