आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागतिमान प्रशासन म्हणून कामाची विभागणी होऊन नागरिकांची कामे लवकर होण्यासाठी स्थापन झालेल्या अपर तहसीलदार कार्यालयात अपूर्ण कर्मचारी व पुरेसा सुविधा उपलब्ध नाहीत. शहरासह १७ गावांचा कारभार या कार्यालयाला जोडण्यात आल्यामुळे थेट नागरिकांच्या कामावर परिणाम होत आहे. या कार्यालयाची स्थापना हाेवून सहा वर्ष झाली. मात्र अजूनही कार्यालयाला स्वत:ची इमारत नाही, अपर तहसीलदारांना वाहन इतकेच काय शिपाई देखील नाही. माेजक्याच कर्मचाऱ्यांच्या भराेशावर कारभार सुरू आहे.
धुळे ग्रामीण तहसीलदार कार्यालयातून शहराचा व ग्रामीणचा कारभार चालवला जात हाेता. मात्र वाढती लाेकसंख्या, शहराचा विस्तार या कारणामुळे शासनाकडून धुळे शहर व परिसरातील गावांसाठी स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय १ मे २०१६ पासून स्थापन केले. सुरूवातीला या कार्यालयाकडे केवळ शहराची जबाबदारी हाेती. मात्र नंतर त्यात निवडणूक व इतरही कामकाज देण्यात आले.
छाेट्या जागेतून कार्यालयाचा कारभार
अपर तहसिल कार्यालय स्थापन झाल्यानंतर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका छाेट्या जागेत हे कार्यालय सुरू करण्यात आले. अपर तहसिलदार, निवासी नायब तहसीलदारांचे दालन व एक छाेटा हाॅल असे या कार्यालयाचे स्वरूप आहेत. ६ वर्ष झाली तरीही कार्यालयाला प्रशस्त जागा उपलब्ध झालेली नाही. स्वमालकीच्या जागेचा शाेधा परंतु भाडेतत्त्वावरही जागा नाही. डाएटची जागेची मागणी केली गेली हाेती. मात्र ती नाकारण्यात आली. तसेच सध्या जेलराेडवरील महिला हॉस्टेलच्या जागेवर कार्यालयाचा प्रस्ताव आहे. मात्र त्याबाबत अजून कोणताही निर्णय नाही.
या कामांची आहे जबाबदारी
अपर तहसीलदाराकडे राजशिष्टाचाराचाही भाग येताे. त्यामुळे जिल्ह्यात येणारे वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांचे स्वागत, निवासभाेजनाची जबाबदारीत्यांना सांभाळावी लागते.अदखल पात्र गुन्ह्यातील आराेपीकडून चांगल्या वागणुकीची हमी घेवून त्यांना साेडणे, अगीच्या घटनांचा पंचनामे, न्यायालयात जबाबासाठी हजर राहणे, शहरातील कार्यक्रम, आंदाेलनांनाला परवानगी देणे.
कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार, मात्र पुरवठ्याचे नाही
सुरूवातीला अपर तहसीलदारांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार दिले नव्हते. मात्र नंतर ते देण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कामाची जबाबदारी वाढली. दुसरीकडे कार्यकारी दंडाधिकारीचे अधिकार मिळाले असले तरी अजूनही पुरवठ्यासंदर्भात काेणतेही अधिकार दिलेले नाहीत. तसेच शासनाच्या विविध याेजनांबाबतही काेणतेही अधिकार नाहीत. तसेच नव्याने धुळे विधानसभा मतदार संघ, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचीही जबाबदार अपर तहसिल कार्यालयाकडे देण्यात आली आहे.
धुळे ग्रामीण तहसील : तहसिलदार १, नायब तहसीलदार ६, अव्वल कारकून ८, वाहनचालक १, लिपिक २५, शिपाई ११, मंडळ अधिकारी १२, तलाठी ७२, इमारत स्वमालकीची, एकूण गावे १५३
धुळे अपर तहसील : तहसिलदार १, नायब तहसिलदार १, अव्वाल कारकून २, लिपिक ५, वाहन ०, शिपाई ०, तलाठी ४ ,इमारत-भाडे तत्वावर, एकूण गावे- शहरासह १७ गावे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.