आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता विकास कामे किमान एक महिना थांबतील. दोन महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अश्विनी पवार-जाधव यांनी सूत्रे हातात घेतली होती.
त्यानंतर त्यांनी विकास कामांचे नियोजन सुरू केले होते. पण आता नवीन विकास काम सुरू करता येणार नाही. जिल्हा परिषदेत कोणत्या तालुक्यात व कोणत्या गावात कोणते काम करावे याचा आराखडा करण्याचे काम सुरू होते. हे नियोजन आता अंतिम टप्प्यात आलेले असताना विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.