आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण मोठा:दसऱ्याला सुवर्ण सीमोल्लंघन, दागिने विक्रीतून तब्बल 5 कोटींची उलाढाल

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुकूल नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम बाजारपेेठेवर कसा होतो, याची एक चांगली झलक सुवर्णकारांच्या कट्ट्यांवर पाहण्यास मिळाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुवर्ण सिमोल्लंघनाप्रमाणेच परिस्थिती होती. एकाच दिवसात सायंकाळी ६ पर्यंत तब्बल पाच कोटींची उलाढाल दागिन्यांच्या खरेदी - विक्रीतून झाली. यावेळी फॅन्सी डिझाईनच्या दागिन्यांची रेलचेल पाहण्यास मिळाली.

हिंदू उत्सव श्रृंखलेमध्ये दसरा एक पूर्ण शुभ मुहूर्त समजला जातो. विविध चांगल्या बाबींची सुरुवात या दिवशीच केली जाते. तसेच नवीन खरेदीलाही यामध्ये भर दिला जातो. सुवर्ण दागिण्यांची खरेदी तर अत्यंत शुभ मानली जाते. यामुळे या दिवशी दागिने खरेदी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. यावर्षी तर नैसर्गिक परिस्थिती मोठी अनुकूल आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्रच आनंदाचे वातावरण आहे. याचा परिणामही बाजारापेठेवर सकात्मकरित्या पाहण्यास मिळाला.

दसऱ्याला सराफा कट्ट्यावर मोठी गर्दी दिसत होती. सकाळपासूनच शहरातील प्रत्येक दुकानामध्ये ग्राहक दागिन्याचे अवलोकन करत होते. नंतर त्याचवेळीपासून खरेदीही केली जात होती. शहरात लहान – मोठी ७० दुकाने आहेत. या दुकानांमधून कमी - अधिक प्रमाणात दागिन्यांची खरेदी झाली. यातून सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक ग्राहक २२ कॅरेट दागिन्यांचीच खरेदी करत होते. २४ कॅरेटसाठी क्वचितच विचारणा होत होती. अनेक दुकानात तर पूर्वीच ऑर्डर देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दसऱ्याला पुन्हा येऊन खरेदचा मुहूर्त साधण्यात आला. अनेक दुकाने रात्री उशीरापर्यंत सुरू होती. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील दुकानांमध्येही मोठ्याप्रमाणात दागिन्याची खरेदी झाली.

अन्य ठिकाणीही गर्दी
दागिन्यांसोबतच अन्य दुकानांमध्येही दसऱ्यानिमित्त गर्दी दिसत होती. कपडे, टीव्ही, फ्रिज, मिक्सर, घड्याळे, दुचाकी, चारचाकी वाहनांचाही मोठी खरेदी करण्यात आली. अनेक सहकुटुंब खरेदी करण्यासाठी आलेले दिसत होते. यामुळे अशा दुकानांमध्येही चांगलीच गर्दी दिसून येत होती. या व्यवसायिकांचीही मोठी उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...