आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी:बाजारपेठेत दसऱ्याच्या खरेदीची लयलूट; 75 काेटींचे सीमाेल्लंघन

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण, वाहन, साेने आणि इलेक्ट्राॅनिक्स, कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाली हाेती. खरेदीदारांकडून दसऱ्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे शहरात सुमारे ७० ते ७५ काेटींची उलाढाल झाल्याचा अंदाज विविध क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दाेन वर्षांनंतर ग्राहकांनी दसऱ्याला माेठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

मुहूर्तावर साेने खरेदीला पसंती
साडेतीन मुहूर्तापैकी दसऱ्याचा एक मुहूर्त असल्याने साेने खरेदीला नागरिकांनी पसंती दिली. एक ग्रॅमपासून पुढे साेने खरेदी केले. यातून सराफ बाजारातही सुमारे एक ते दीड काेटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...