आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाच्या गाव तेथे ग्रंथालय या घोषवाक्यानुसार शहरातील पांझरा किनारी जिल्हा ग्रंथालय अर्थात ग्रंथ भवन उभारले आहे. अमेरिकेच्या व्हाइट हाऊससारखी ग्रंथालयाची इमारत आहे. या ठिकाणी आता ई-बुक रीडर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल १२ हजार पुस्तके आहेत. या ठिकाणी स्वतंत्र अभ्यासिका आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ग्रंथ भवन पंढरी ठरते आहे.
जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची स्थापना १९९६ मध्ये झाली. जिल्हा शासकीय ग्रंथालय सुरुवातीला भाडेतत्त्वावरील इमारतीत होते. त्यानंतर जिल्हा वार्षिक याेजनेतून पांझरा नदी किनारी ग्रंथभवन उभारण्यात आले. या कामावर सुमारे सहा कोटी रुपये खर्च झाले. अनेकांना स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे संदर्भ ग्रंथ किंवा पुस्तकाची खरेदी करणे शक्य होत नाही. तसेच तरुणांना अभ्यासासाठी पोषक वातावरण घर किंवा आजूबाजूच्या परीक्षात मिळू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका आहे. तसेच १२ हजार पुस्तक आहे. स्पर्धा परीक्षा देणारे तरुण पाहिजे ते संदर्भग्रंथ, पुस्तके नि:शुल्क अभ्यासू शकतात.
ई-बुक रीडर्सची सुविधा जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रंथ भवनाची निर्मिती झाली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे मार्गदर्शन मिळते. ग्रंथालयाने काळाची पावले उचलून स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आॅनलाइन सुविधा उलपब्ध करून दिली आहे. ग्रंथालयातर्फे ई-बुक रीडरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जगदीश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी.
साडेतीनशे विद्यार्थी एकाच वेळी बसू शकतात अशी अभ्यासिका ग्रंथ भवनात तळमजल्यावर तीन व पहिल्या मजल्यावर तीन असे सहा कक्ष आहेत. त्यापैकी एक सभागृह आहे. त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी चालू घडामोडींवर गटचर्चा घडवून आणतात. अभ्यासासाठी बैठक व्यवस्था आहे. एकाच वेळी साडेतीनशे विद्यार्थी याठिकाणी अभ्यास करू शकतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.