आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे:जिल्हा परिषदेत ई-टेंडर सेल होणार कार्यरत; निविदा प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकाराला चाप

धुळे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतीतर्फे निविदा प्रकिया न राबवता कामे केली जातात. निविदा प्रक्रियेत होत असलेल्या गैरप्रकाराविषयी ‘दिव्य मराठी’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे चार वर्षांपासून बंद झालेला ई-टेंडर सेल पुन्हा सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी ही माहिती दिली.

ग्रामपंचायतीच्या हद्दीत होणाऱ्या १० लाखांवरील विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. पण बहुतांश ग्रामपंचायती निविदा प्रक्रिया न राबवताच मर्जीतील ठेकेदारांना कामे देतात. याशिवाय एओसी आणि डीआयसी सारख्या महत्त्वाच्या दस्तएेवजात हेराफेरी करण्यात येते. या प्रकारांवर वचक बसावा या उद्देशाने जिल्हा परिषदेत ई-टेंडर सेल सुरू झाला होता. पण हा विभाग चार वर्षांपासून बंद आहे. याविषयी ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर हा विभाग सुरू होतो आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेतील घोळ थांबेल. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून ई-टेंडर सेल बंद होता. या काळातील गैरप्रकारांची चौकशी व्हावी.

बातम्या आणखी आहेत...