आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्ती:शाडू माती, पेपरच्या कपापासून साकारल्या पर्यावरणपूरक मूर्ती

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सिंधुरत्नज एसव्हीसी (महात्माजी) इंग्लिश स्कूलमध्ये शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्यावर कार्यशाळा घेण्यात आली. अॅड. पूजन गुजराती यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले.

विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत कल्पनाशक्तीचा वापर करून सुरेख गणेशमूर्ती बनवल्या. प्री-प्रायमरी शाळेतील चिमुकल्यांनी पेपर कपपासून आकर्षक गणपती तयार केले. या गणेशमूर्तींची प्रतिष्ठाना करण्यासह पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत केला. राज्य सिंधी साहित्य अकादमीचे माजी सदस्य व चेअरमन सुरेश कुंदनाणी, संस्थेचे अध्यक्ष तनुकुमार दुसेजा, अॅड. रसिका निकुंभ, उपमुख्याध्यापिका शालिनी मंदान आदी उपस्थित हाेते. गणेशमूर्ती बनवण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या प्लॅस्टर आॅफ पॅरिसमुळे पर्यावरणाला धाेका निर्माण हाेताे. तसेच मूर्तींचे लवकरच विघटन हाेत नाही. केमिकल, कृत्रिम रंगामुळे जलप्रदूषण हाेते. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे केले. मुख्याध्यापक आमीर खान, उपमुख्याध्यापिका शालिनी मंदान यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला.

बातम्या आणखी आहेत...