आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपकरण सर्वोत्कृष्ट:इको फ्रेंडली सोसायटी, अंधाचा चष्मा, ऑइल क्लिमर उपकरण सर्वोत्कृष्ट

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विसपुते विद्यालयात धुळे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले. प्रदर्शनात इको फ्रेंडली सोसायटी, अंधाचा चष्मा, आॅइल क्लिमर, सॉफ्टवेअर अॅप प्रोजेक्टर या उपकरणांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेते जिल्हास्तरीय प्रदर्शनात सहभागी होतील. बालवैज्ञानिकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

पंचायत समितीचा शिक्षण विभाग, शहर व तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, विज्ञान व गणित अध्यापक संघातर्फे हे प्रदर्शन झाले. त्याचा शनिवारी समारोप झाला. आदर्श संस्थेचे चेअरमन धनराज विसपुते अध्यक्षस्थानी होते. या वेळी महेंद्र विसपुते, पंचायत समितीचे सभापती विजय पाटील, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, संस्थेच्या सचिव स्मिता विसपुते, गणित व विज्ञान अध्यापक संघाचे संजय पवार, प्रा. जे. एस. पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर. जे. पाटील, विस्तार अधिकारी एस. ई. बागुल, विस्तार अधिकारी संजीव विभांडिक, जयवंत सोनवणे, के. सी. साळुंखे, प्राचार्य पी.बी. पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. जगदीश मोरे, मनोज पाटील, प्रवीण पाटील, जे.बी. भामरे, तुषार देसले, आर. के. राजपूत, एस. जे. पवार, रियाज अहमद शाकीर अली, एम.एम. बुवा, आर.बी. मगर, पी. बी. नेरपगार यांनी परीक्षण केले. अविनाश पाटील, अपर्णा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राजीव पटेल यांनी आभार मानले.

प्रदर्शनात यांची मारली बाजी ग्रामीण विभाग : माध्यमिक गट- मानसी खरे : इको फ्रेंडली सोसायटी प्रथम, राजनंदिनी माळी : फ्लोटिंग हाऊस द्वितीय, गौरव ढगे : फायर अलार्म तृतीय. प्राथमिक गट- कुणाल झाल्टे : सॉफ्टवेअर अॅण्ड अॅप प्रोजेक्टर प्रथम, यामिनी पाटील : गणितीय मॉडेल द्वितीय, प्रतीक मराठे स्मार्ट झेब्रा क्राॅसिंग तृतीय. शहरी विभाग : माध्यमिक गट- साहिल साळुंखे : ऑइल क्लिमर प्रथम, अभिजित कोल्हे : आरोग्य व स्वच्छता संदेश द्वितीय, सर्वेक्ष पाटील : हाताच्या साहाय्याने त्रिकोणमिती तृतीय. प्राथमिक गट- समर्थ विसपुते : अंध व्यक्तीसाठी चष्मा प्रथम, सय्यद फहिम अली : ब्लो गम द्वितीय, भावेश शेलार : खेळातून गणित तृतीय.

बातम्या आणखी आहेत...