आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:लोकसंस्कृती, लोकजीवन,‎ पर्यावरणावर केले प्रबोधन‎

धुळे‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई‎ कन्या शाळा व घासकडबी कनिष्ठ‎ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान‎ दिनानिमित्त कार्यक्रम झाला. या वेळी‎ गोव्याचे पर्यावरण संरक्षक व संवर्धक‎ राजेंद्र केरकर, लोकसंस्कृती व‎ लोकजीवनाच्या अभ्यासक पौर्णिमा‎ केरकर, समृद्धी केरकर यांचे पर्यावरण,‎ लोकजीवन, लोकसंस्कृती व निसर्ग‎ कन्येची माझी हिरवी शाळा याविषयावर‎ व्याख्यान झाले.‎

संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी,‎ सचिव शिल्पा म्हस्कर, सदस्या साधना‎ मानेकर, सदस्य एन. एम. जोशी, प्राचार्या‎ मनीषा जोशी, उपमुख्याध्यापिका मनीषा‎ ठाकरे, पर्यवेक्षिका छाया नाईक, जयश्री‎ शिरोळे, वंदना खैरनार, प्रा. सोमनाथ‎ शिरसाठ, प्रा. दिलीप टिपरे, प्राथमिक‎ विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना मोरे,‎ बालमंदिरच्या मुख्याध्यापिका ज्योती‎ निकुंभ, गजानन शेट्ये, सूर्यकांत‎ गावकर, ग्रंथपाल सोनल जोशी,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अधीक्षक मिलिंद कुलकर्णी, दिलीप‎ काळे आदी उपस्थित होते.

सकाळच्या‎ सत्रात चौथी ते सहावीच्या विद्यार्थिनींना‎ समृद्धी केरकर यांनी मार्गदर्शन केले.‎ पौर्णिमा केरकर यांनी गोवा-महाराष्ट्र‎ संस्कृतीचे अनुबंध याविषयावर‎ मार्गदर्शन केले. त्यांनी पीपीटीच्या‎ माध्यमातून गोव्यातील सण, उत्सवांची‎ माहिती दिली. या वेळी राजेंद्र केरकर‎ यांनी १२० पुस्तक शाळेच्या ग्रंथालयाला‎ भेट दिली.‎

बातम्या आणखी आहेत...