आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षणातून विचारांची प्रगल्भता वाढते. शिक्षणामुळेच सुजाण नागरिक घडतात. कुटुंब व्यवस्था बळकट ठेवण्यासाठी महिलांनी शिक्षण घेण्यासह घरात संवाद वाढवावा, असे मत शहाद्यात डॉ. मंगला फुलंब्रीकर यांनी व्यक्त केले. महिला दिनानिमित्त येथील क्रांतिज्योती पतसंस्थेच्या सभागृहात रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबतर्फे कार्यक्रम झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. प्रा. संदीप गिरासे अध्यक्षस्थानी होते.
या वेळी बाळकृष्ण बोरसे उपस्थित होते. डॉ. मंगला फुलंब्रीकर म्हणाल्या की, कुटुंबाच्या प्रगतीत महिलांचा मोठा वाटा असतो. महिलांनी त्यांची ऊर्जा घराच्या प्रगतीसाठी वापरावी. कुटुंबाचा विश्वास संपादन करावा. मुलांवर चांगले संस्कार करावे. महिलांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. महिला तिच्या कर्तृत्वाने मोठी आहे आणि पुढेही मोठीच असेल. मात्र, काळाच्या ओघात महिला तिची क्षमता विसरली आहे. जेव्हा महिलांना त्यांचे सामर्थ्य कळेल तेव्हा महिला दिवस साजरा करण्याची वेळ येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी मुलांनी गीत सादरीकरण केले.
पुरुषांनी निवडले गहू अन् लाटल्या पोळ्याही
या वेळी पुरुषांसाठी विविध स्पर्धा झाल्या. त्यात गहू निवडणे, पोळ्या लाटणे, शर्टाचे बटण लावणे, सुईत धागा ओवणे यासह अन्य स्पर्धांचा समावेश होता. स्वयंपाक घरासह अन्य काम करताना महिलांची कशी तारांबळ उडते हे पुरुषांना समजावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती तृप्ती गिरासे, स्मिता देशमुख यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.