आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस वर्षांपासून सुरू आहे उपक्रम:आजोबांच्या आठवणीत नातवातर्फे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

कापडणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील धनूर येथील चेतन शिंदे हा आजोबांच्या स्मरणार्थ गेल्या वीस वर्षांपासून विधायक उपक्रम राबवतो आहे. तो दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतो. धुळे तालुक्यातील धनूर येथील माजी सरपंच शिवाजीराव नथू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा नातू चेतन शिंदे हा दरवर्षी गोरगरिबांना मदत करतो. शिवाजी पाटील यांची विसावी पुण्यतिथी नुकतीच झाली. या वेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. अनंत खैरनार अध्यक्षस्थानी होते. जनार्दन महाराज आरावेकर यांचे कीर्तन झाले. या वेळी धनूर, लोणकुटे, कापडणे, तामसवाडी, हेंकळवाडी, दापुरा, दापुरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. आजोबांनी ३२ वर्षे सरपंच पद भुषवत गावाची सेवा केली. त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी यासाठी विद्यार्थ्यांना मदत करतो असे चेतन शिंदे याने सांगितले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...