आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्जेदार शिक्षण:दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्न, प्रत्येक आठवड्याला पंचायत समितीला भेट ; जिल्हा परिषदेच्या सीईओ बुवनेश्वरी एस यांचा संकल्प, शिस्त लावली जाणार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी शुक्रवारी पदभार स्विकारला. त्यानंतर गेल्या पाच दिवसात त्यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. तसेच महत्त्वाच्या २८ विषयांची यादी तयार केली. याविषयावर त्या आता लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यात दर्जेदार शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधांसह अन्य विषयांचा समावेश आहे. त्याचबरोबर कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी त्या प्रत्येक आठवड्याला पंचायत समितीला भेट देतील.

जिल्हा परिषदेला मुख्यकार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी पदभार घेतल्यावर पहिल्या दिवसापासून कामकाजावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी सर्व विभागांची मुद्देसुद माहिती घेतली. तसेच विशेष काम करण्यासारखे २८ विषय निश्चित केले आहे. त्यातील बहुतांश विषय शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण विभागाशी निगडीत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. तसेच सुरक्षीत मातृत्व योजना, पंतप्रधान जननी सुरक्षा योजनेची योग्य पध्दतीने अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. ग्रामविकासाचे काम हे ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होते. ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेला जोडणारा महत्त्वाचा दुवा पंचायत समिती आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सीईओ बुवनेश्वरी एस प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यातील एका पंचायत समितीला भेट देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...