आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:भारनियमन, पाणीपुरवठा ताळमेळसाठी प्रयत्न ; महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सद्य:स्थितीत पाच ते सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. पण भारनियमनामुळे पाणी सोडण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची वेळ व भारनियमनाचा ताळमेळ बसवण्यासाठी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मनपा प्रशासन चर्चा करणार आहे. शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले होते. विविध भागात आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत होता. याविषयी तक्रारी झाल्यावर महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले. भारनियमन होत असल्याने अनेकवेळा अडचणी येतात. अनेक भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाणीपुरवठा व भारनियमनाच्या वेळेचा ताळमेळ बसावा यासाठी मनपा प्रशासन वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. ही बैठक सोमवारी होणार आहे.

देवपूर भागात अद्यापही अवेळी पाणीपुरवठा सुरूच शहरातील देवपूर भागातील इस्लामपुरा, दत्त कॉलनी, प्रभातनगर व परिसरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. पहाटे ३ वाजता पाणी सोडल्यानंतर उशिरापर्यंत पाणीपुरवठा सुरू राहतो. अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची झोपमोड होते.

बातम्या आणखी आहेत...